स्थैर्य, सोलापूर,दि.२४: राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांसाठी जानेवारी ते मार्च 2021 या तीन महिन्याचे सोलापूर ग्रामीणसाठीचे गहू, तांदळाचे नियतन प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल कारंडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
अंत्योदय अन्न योजनेत 55 हजार 999 शिधापत्रिका असून गहू प्रती कार्ड 25 किलोप्रमाणे 1400 मेट्रिक टन तर 560 मेट्रिक टन तांदळाचे प्रती कार्ड 10 किलो नियतन मंजूर झाले आहे. प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांची संख्या 17 लाख 47 हजार 63 एवढी असून गहू प्रती लाभार्थी 3 किलोप्रमाणे 5241 मेट्रिक टन तर तांदूळ प्रती लाभार्थी 2 किलोप्रमाणे 3494 मेट्रिक टन धान्य प्राप्त झाल्याची माहितीही श्री. कारंडे यांनी दिली.