नाताळनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, मुंबई, दि. २५ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र व गोव्यातील जनतेला नाताळ निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

सर्व जगभर साजरा केला जाणारा नाताळचा सण भगवान येशू ख्रिस्तांच्या प्रेम, दया व करुणेने परिपूर्ण भरलेल्या जीवनाचे स्मरण देतो. येशू ख्रिस्तांनी मानवतेच्या कल्याणासाठी संपूर्ण आयुष्य वेचले. नाताळचा पवित्र सण सर्वांच्या जीवनात आनंद, आरोग्य व संपन्नता घेवून येवो, अशी मी प्रार्थना करतो. सर्वांना नाताळ तसेच आगामी वर्ष २०२१ निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!