वाचनाने माणसाचा मन, मेंदू आणि मनगट मजबूत होते – प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १८ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
वाचनाने माणसाचा मन, मेंदू आणि मनगट मजबूत होत असते, माणूस संस्कारक्षम होत असतो. वाचन ही काळाची गरज आहे. माणसाला अन्न आणि पाण्याची जेवढी गरज असते तेवढीच माणसाला पुस्तकाची गरज असणे आवश्यक आहे. समृद्ध आणि वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ जगण्यासाठी वाचन संस्कार महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन शरदचंद्र पवार महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव यांनी केले.

यावेळी व्यासपीठावरती उपप्राचार्य एस. एन. जाधव, उपप्राचार्य भीमराव काकडे, ग्रंथपाल नंदकुमार साळुंके, मराठी विभाग प्रमुख सुभाष कदम आदी मान्यवर उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेचे शरदचंद्र पवार महाविद्यालय, लोणंद येथे ग्रंथालय विभाग व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती सर्व देशात ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी सामूहिक वाचन करून हा वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.

प्रास्ताविक महाविद्यालयातील ग्रंथपाल प्रा. नंदकुमार साळुंके यांनी केले. यावेळी वाचनाचे महत्त्व आणि कार्यक्रमाचा हेतू त्यांनी आपल्या प्रास्ताविकात मांडला. प्राध्यापक सौ. छाया सकटे, डॉ. कोकिळा चांगण, प्रा. सतीश कांबळे महाविद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांचे आभार मराठी विभागप्रमुख सुभाष कदम यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!