
दैनिक स्थैर्य । 11 जून 2025। फलटण । विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बावस्कर गल्ली येथील श्री रंगारी महादेव मंदिराच्या गाभार्याचा जिर्णोधार, शिवपिंडीच्या वजर्लेपाचे कार्य व शिवपिंडीचे पुन:प्रतिष्ठापना सोहळा कार्यक्रमाचे रविवार दि. 8 रोजी आयोजन करण्यात आले होते.
यानिमित्त शनिवार दि. 7 रोजी सकाळी 10 वाजता गणेश पूजन, प्रायश्चित विधी, नवग्रह पूजन, प्रधान कलश स्थापना, सर्व देवता स्थापना, अग्निस्थापना, जलादिवस, धान्यादिवस आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रविवार दि. 8 जून रोजी सकाळी 5.30 वाजता पंचाक्षरी मंत्रजप, सकाळी 9 वाजता श्री गणेश पूजन, होमहवन, रुद्राभिषेक, सकाळी 10 वाजता श्री शिवपिंडी पुन:प्राणप्रतिष्ठा व पूर्णाहुती विधी , 11 वाजता प्रवचन आदी कार्यक्रम करण्यात आले. दुपारी 1 वाजता महाप्रसादाचे आयोजन केले होते. रात्री 9 वाजता श्री स्वामी समर्थ भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम करण्यात आला. कार्यक्रमास गौवसिंद्ध मंदिर जुना पन्हाळा बेळंकी, ता. मिरज येथील प.पू. श्री सद्गुरू शिवयोगी सिद्धलिंग शिवाचार्य महाराज व साखरवाडी येथील श्री स्वयंभू दत्त मंदिराचे मठाधिपती प.पू. श्री महंत उमेशानंद पुरीजी महाराज उपस्थित होते.
या कार्यक्रमात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. कार्यक्रमास फलटण शहरातील विविध मान्यवर उपस्थित होते.