महाराष्ट्र राज्य कॅरम असोसिएशन शासकीय परिषद सदस्यपदी सुनिल चतुर यांची फेरनिवड


दैनिक स्थैर्य । दि. २६ जुलै २०२३ । फलटण । महाराष्ट्र राज्य कॅरम असोसिएशन शासकीय परिषद सदस्यपदी सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे निवृत्त स्वीय सहाय्यक सुनिल चतुर, सातारा यांची फेरनिवड झाली असून या निवडीबद्दल श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

दादर क्लब, दादर पूर्व, मुंबई येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र कॅरम असोसिएशन वार्षिक सर्वसाधारण सभेत सातारा जिल्हा अम्युचर कॅरम असोसिएशनचे सचिव सुनिल चतुर यांची सन २०२३ ते २०२७ या कालावधी करिता महाराष्ट्र राज्य कॅरम असोसिएशनच्या शासकीय परिषद सदस्यपदी फेर निवड करणेत आली.

महाराष्ट्र राज्य कॅरम असोसिएशन अध्यक्ष जितेंद्र शहा पालघर, सचिव अरुण केदार (शिवछत्रपती पुरस्कार विजेते) मुंबई, सहसचिव अभिजीत मोहिते कोल्हापूर, सातारा जिल्हा अम्युचर असोसिएशन संस्थापक, (शिवछत्रपती पुरस्कार विजेते) विजय जाधव, असोसिएशन अध्यक्ष राजनशेठ जोशी (चिपळूणकर), उपाध्यक्ष अविनाश कदम, सन्माननीय पदाधिकारी अनुक्रमे सर्वश्री संजय मांडके, विलास बिटले (कदम), निलेश महाडिक, डॉ. भास्कर यादव, देवेंन गिजरे व सर्व सन्माननीय सदस्य यांनी सुनिल चतुर यांच्या फेरनिवडीबद्दल अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!