फलटण तालुका तलाठी संघटनेच्या अध्यक्षपदी लक्ष्मण अहिवळे यांची फेरनिवड


दैनिक स्थैर्य | दि. ५ ऑक्टोबर २०२४ | फलटण | फलटण तालुका तलाठी संघटनेची सन २०२४-२०२९ पर्यंत कार्यकारणी निवड बैठक नुकतीच संपन्न झाली आहे. त्यामध्ये लक्ष्मण सुभाष अहिवळे यांची अध्यक्षपदी बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे. योगेश अशोक धेंडे यांची सुद्धा सरचिटणीस पदी फेरनिवड करण्यात आली आहे.

– फलटण तालुका तलाठी संघटनेची नूतन कार्यकारणी –

  1. लक्ष्मण सुभाष अहिवळे – अध्यक्ष

  2. गणेश दत्तात्रय मोरे – उपाध्यक्ष

  3. रावसाहेब काळे – कार्याध्यक्ष

  4. महावीर अहिवळे – कोषाध्यक्ष

  5. योगेश अशोक धेंडे – सरचिटणीस

  6. निलेश गवंड – खजिनदार

  7. मनिषा सावळकर – हिशोब तपासनीस

  8. शिलवंत चव्हाण – संघटक

  9. संदीप कुंभार – सल्लागार

  10. दिपाली शिंदे – महिला प्रतिनिधी

  11. दिपक नलगे – सहसरचिटणीस

  12. कैलास जाधव – मंडलाधिकारी प्रतिनिधी

नवीन कार्यकारिणी सभेप्रसंगी निवडणूक अध्यासी अधिकारी म्हणून महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे माजी उपाध्यक्ष विठ्ठलराव सोडमिसे, सातारा जिल्हा तलाठी संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पारवे यांचे अध्यक्षतेखाली ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

यावेळी सातारा जिल्हा तलाठी संघाचे माजी सरचिटणीस भालचंद्र भादुले तसेच फलटण तालुका तलाठी संघाचे माजी सरचिटणीस बाळासाहेब चोरमले,चंद्रकांत सरगर,सचिन क्षीरसागर, हनुमंत नागरवाड तसेच फलटण तालुका तलासे संघाचे सर्व आजी-माजी सभासद याप्रसंगी बहुसंख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!