फलटणसह राज्यातील “ब” वर्ग नगरपरिषदांच्या रखडलेला प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम पुन्हा जाहीर;

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०६ मे २०२२ । फलटण । कोरोनाच्या व ओबीसी आरक्षणाच्या प्राश्वभुमीवर प्रलंबित राहिलेल्या नगरपरिषदांच्या निवडणुकीच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम राज्य निवडणुक आयोगाने काही दिवसांपूर्वी जाहीर केलेला आहे. त्यानंरत राज्य सरकारने केलेल्या निर्णयामुळे पालिका निवडणूक पुन्हा लांबणीवर जात असल्याचे चित्र तयार झालेले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला स्पष्ट निर्देश दिल्याने पुन्हा निवडणुका जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार जाहीर झालेल्या फलटण नगरपरिषदेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर मंगळवार दि. १० मे ते शनिवार दि. १४ मे पर्यंत हरकती व सूचना दाखल करायच्या आहेत. त्यामुळे स्वतःला भावी व फिक्स नगरसेवक समजणाऱ्यांची घालमेल सुरू झालेली आहे. प्रभाग रचनेबाबत गेले अनेक दिवस फलटण शहराच्या चौकाचौकांमध्ये चर्चा सुरू आहेत.

नक्की कशी आहे फलटण नगरपरिषदेची प्रभाग रचना – https://bit.ly/3FlwyxC

याबाबत अधिक माहिती अशी की, फलटण नगरपरिषदेसह राज्यातील “ब” वर्ग नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हे शहराची प्रभाग रचना ही जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आलेली आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी सदरील प्रभाग रचनेस मान्यता देवुन प्रारूप प्रभाग रचना व नकाशे रहिवाश्यांच्या माहितीसाठी व हरकतीसाठी प्रकाशित करण्यात आलेले आहेत.

नक्की कशी आहे फलटण नगरपरिषदेची प्रभाग रचना – https://bit.ly/3FlwyxC

दि. १० मे ते दि. १४ मे पर्यंत स्थानिक रहिवाश्यांना प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सुचना नोंदवण्यात येणार आहे. दाखल झालेल्या हरकती व सुचनांवर दि. २३ मे पर्यंत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सुनावणी होणार आहे.

नक्की कशी आहे फलटण नगरपरिषदेची प्रभाग रचना – https://bit.ly/3FlwyxC

दि. ३० मे पर्यंत दाखल झालेल्या हरकती व सुचनांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करावयाचा आहे. तर त्यावर दि. ०६ जून पर्यंत “ब” वर्ग नगरपरिषदांच्या अंतिम प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयुक्त मान्यता देणार आहे. व दि. ०७ जून रोजी अंतिम अधिसूचना वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी व नगरपरिषदेच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणार आहे.

नक्की कशी आहे फलटण नगरपरिषदेची प्रभाग रचना – https://bit.ly/3FlwyxC


Back to top button
Don`t copy text!