शेती कायद्याविषयी पवारांच्या व्हायरल पत्रातील भूमिका राऊतांनी केली स्पष्ट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, दि.१३: दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा आज
19वा दिवस आहे. या आंदोलनावर तोडगा निघण्याचीही शक्यता आहे. मात्र, 18
दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी
पुन्हा एकदा भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

पंजाब
आणि हरयाणातील शेतकऱ्यांचे आंदोलन म्हणजे देशातील शेतकऱ्यांच्या भावना
नाहीत हा अपप्रचार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणून जे तीन कायदे मोदी
सरकारने आणले ते नक्की काय आहेत? ते कायदे म्हणजे शेतीचे थडगे व
शेतकऱ्यांचे मरण आहे असे ज्यांना वाटते, त्यांनी हा विषय लोकांना समजावून
सांगायला हवा.

पवारांनी तेव्हा शेतकरी हिताचाच विचार केला होता

शरद
पवार हे कृषिमंत्री असताना त्यांनी बाजार मंड्यांबाबत सुधारणा हवी का? अशी
भूमिका घेतली व तसे एक पत्र राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पाठवले. भाजपने
काळ्या कायद्याच्या समर्थनासाठी श्री. पवार यांच्या या पत्राचा आधार घेतला.
पवारांचा आजचा विरोध हे ढोंग आहे असे ते म्हणतात. यावर माझे म्हणणे असे
की, पवारांनी 10 वर्षांपूर्वी शेती कायद्यातील सुधारणेची भूमिका मांडली
तेव्हा त्यात शेतकरी हिताचाच विचार होता. असे राऊतांनी सामनाच्या रोखठोक
सदरातून स्पष्ट केले आहे.

नवे धोरण आणि कायदे शेतकऱ्यांचे दिवाळे काढणारे

त्यावेळी
अंबानी-अदानी यांनी शेती क्षेत्रात प्रवेश केला नव्हता. बड्या
उद्योगपतींचा हा पसारा गेल्या सहा वर्षांत वाढला आहे. शेती मालाविषयी नवे
धोरण आणि कायदे शेतकऱ्यांचे दिवाळे काढणारे आहे. सर्व काही तोट्यातच चालले
आहे. शेती पिकविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या खर्चात झालेली भरमसाट वाढ व
त्यामानाने मिळणारे कमी दाम यामुळे शेती ही किफायतशीर राहिलेली नाही, तर
धोकाच बनला आहे. असे शिवसेनेने म्हटले आहे.

शेतकऱ्यांचा त्यांनी फुटबॉल केला आहे

हिंदुस्थान
हा प्रामुख्याने खेड्यात आहे, शेती हा हिंदुस्थानी अर्थजीवनाचा कणा आहे ही
सर्व प्रमेयेच खोटी ठरवणारे आंदोलन पंजाब-हरयाणाचा शेतकरी करीत आहे.
शेतकरी दुसरा कोणता व्यवसाय करणार? किराणा मालाच्या व्यवसायातही बडे
उद्योगपतीच घुसले. शेतकरी खचला तर देशाचे सर्व अर्थशास्त्र व समाजव्यवस्था
कोसळून पडेल. मंत्री येतील व जातील, परंतु या देशाची शेतीच नष्ट झाली तर
देश भकास होऊन जाईल. चीनसारखा कम्युनिस्ट देश व अमेरिकेसारखा भांडवलशाही
देश आपल्या शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र सांभाळतो. अशा परिस्थितीत हिंदुस्थान
सरकारची ही अनास्था का? पंजाब-हरयाणाच्या शेतकऱ्यांचा त्यांनी फुटबॉल केला
आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांची याचना कवडीमोलाची ठरत आहे. शेतकरी
मरत आहे. त्याला कुणी वाचविणार आहे काय? असा सवालही शिवसेनेने केला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!