खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून देण्यासाठी रश्मीताई बागल गटाचा निर्धार…

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २४ मार्च २०२४ | फलटण |
माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने निवडून देण्यासाठी रश्मीताई बागल गटाने निर्धार केला आहे. करमाळा येथे आज भारतीय जनता पक्षाच्या नेत्या रश्मीताई बागल यांच्या समर्थकांची बैठक त्यांच्या निवासस्थानी पार पडली. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, सरचिटणीस गणेश चिवटे, इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना भाजप नेत्या रश्मीताई बागल म्हणाल्या की, माढा लोकसभा मतदारसंघातून विशेषत: करमाळा तालुक्यातून आम्ही सर्व महायुतीचे नेते, कार्यकर्ते, एकत्र येऊन मोठ्या मताधिक्क्याने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना यावेळी करमाळा तालुक्यातून लीड देणार आहे.

बागल पुढे म्हणाल्या की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाने भारत हा प्रगतशील देश बनला आहे. त्यामुळे लोकसभा मतदारसंघातील सर्व प्रश्न विशेषत: करमाळा तालुक्यातील पाणीप्रश्न, रेल्वे, रस्ते हे विषय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मार्गी लावले आहेत. त्यामुळे आमच्या तालुक्यातील जनता खासदारांच्या कामावर खुश आहे.

यावेळी बोलताना खासदार रणजितसिंह म्हणाले की, मला मिळालेल्या संधीतून मतदार संघातील विकासाच्या दृष्टीने सर्व प्रश्न मी मार्गी लावलेले आहेत. भविष्यात माढा लोकसभा मतदारसंघ हा देशातील एक विकासाचे मॉडेल म्हणून उदयास येणार आहे. उर्वरित सर्व प्रश्न पुढील पाच वर्षांमध्ये मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, युवक अध्यक्ष शंभूराजे जगताप व इतर सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!