स्थैर्य, दि.८: डियन एअरफोर्स डेची 88 वी परेड गुरुवारी उत्तरप्रदेशच्या गाजियाबाद येथील हिंडन एअरबेसवर झाली. यामध्ये पहिल्यांदा राफेल जेटही सामिल झाले. चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (CDS) जनरल बिपिन राव, आर्मी चीफ जनरल मनोज मुकुंद नरवणे, चीफ ऑफ नेवल स्टाफ एडमिरल करमबीर सिंह आणि एअरफोर्स चीफ एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया कार्यक्रमात उपस्थित होते. भदौरिया म्हणाले की, उत्तर सीमेवरील तणावाच्या परिस्थितीत आपल्या एअर वॉरियर्सने तडफदारपणा दाखवला. आपण कमी काळात लढाऊ एसेट्स तैनात केले आणि आर्मीची गरज पाहता सपोर्ट दिला.
राफेलसह 56 विमानांनी कसरती दाखवल्या
यावेळी एकूण 56 विमानांनी परेडमध्ये भाग घेतला. फ्लाय पास्टमध्ये राफेल व्यतिरिक्त लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस, जगुआर, मिग -29, मिग -21, सुखोई -30 हेदेखील सहभागी होते. इंडियन एअरफोर्सच्या म्हणण्यानुसार, राफेल हे 4.5 जनरेशनचे लढाऊ विमान आहे. यामध्ये ट्विन-इंजिन ओम्निरोल, एअर सुपरमॅसी, इंटरडिशन, एरियल रिकॉनिसन्स, ग्राउंड सपोर्ट, इन दीप स्ट्राइक, अँटी शिप न्यूक्लिअर डिटरेंस या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. याद्वारे शत्रूंवर अनेक प्रकारच्या शस्त्रांनी आक्रमण केले जाऊ शकते.
हवाई दलाचे प्रमुख भदोरिया आपल्या भाषणात म्हणाले, “भारतीय वायु सेना ट्रान्सफॉर्मेशनल बदलाच्या टप्प्यात आहे. आपण अशा टप्प्यातून जात आहोत, ज्यामध्ये नव्या पध्दतीने वायुसेनाच्या ताकदीचा वापर होईल आणि इंटीग्रेटेड मल्टी-डोमेन ऑपरेशंस चालवले जातील. हे वर्ष विलक्षण असेल. जगातील कोरोना संक्रमणादरम्यान आपल्या देशाचा प्रतिसाद भक्कम होता. आपल्या हवाई योद्ध्यांचा संकल्प पाहता, सध्याच्या युगात हवाई दल पूर्ण क्षमतेने कार्य करत राहील हे निश्चित आहे. आम्ही देशाच्या संरक्षणासाठी प्रत्येक स्थितित तयार राहू”