प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये राफेलने प्रथमच उड्डाण केले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, दि. २६ : देश आज 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. राजपथवर परेडला सुरुवात झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी राजपथवर उपस्थित आहेत. यावेळी बांग्लादेशची तुकडी पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाच्या समारोहात सहभाग घेत आहे. कोरोनामुळे यावेळी परेडचे स्वरूप बदलेले दिसेल. 55 वर्षांत पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनी कोणीही प्रमुख पाहुणे सहभागी होणार नाहीत. याआधी भारतात 1952, 1953 आणि 196 मध्ये प्रजासत्ताकदिनी परेडमध्ये कोणतेही प्रमुख पाहुणे सहभागी झाले नव्हते.

भारतीय हवाईदलाची ताकद : प्रजासत्तादिनी हवाईदलाने त्रिनेत्रक रचना केली. याला त्रिशूल रचना देखील म्हटले जाते. यामध्ये एक राफेल लढाऊ विमान देखील समावेश होता. राफेलची पहिली खेप गेल्या वर्षीच भारतीय हवाई दलाला प्राप्त झाली.

केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर लडाखचा पहिला चित्ररथ यावर्षी परेडमध्ये सामील झाला. यामध्ये राज्याची संस्कृतीचे दर्शन दाखवण्यात आले.- 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये बांगलादेशच्या सैन्याची तुकडी मुख्य आकर्षण राहिली. या तुकडीचे नेतृत्व कर्नल अब मोहम्मद शमूर शाबान यांनी केले. आपल्या प्रजासत्ताक दिन समारोहात पहिल्यांदाच बांगलादेशच्या सैन्याने भाग घेतला आहे. या तुकडीत एकूण 122 जवान सहभागी आहेत.


Back to top button
Don`t copy text!