
दैनिक स्थैर्य । दि. १५ मार्च २०२३ । सातारा । रंगान न्हावू, चिंब होवू, साथीने बेभान होवू, असा काहीसा रंगाचा सण म्हणजे रंगपंचमी. रंगपंचमीचा सण सातारा शहरासह जिल्ह्यात मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. रविवारी सकाळपासून सातारा शहरातील पेठापेठांमध्ये बालगोपाळ विविध रंगात आपले चेहरे रंगवून आपल्या मित्रांना रंगवण्याच्या धडपडीत पळापळीत दिसत होती. मोठ्यांनीही या सणांचा एकमेकांना रंग लावून सण मोठ्या उत्साहात साजरा केला.
सातारा शहरात रंगपंचमीनिमित्ताने यावर्षी मोठा उत्साह असल्याचे पहायला मिळत होते. मंगळवार तळ्यापासून ते गोडोलीतल्या चौकापर्यत आणि सदरबझारमधील भारत माता मंडळाच्या चौकापासून करंज्यातल्या भगवा चौकापर्यंत. समर्थ मंदिरपासून ते शाहुपूरीतल्या गडकर आळीतल्या प्रत्येक ठिकाणी बाळगोपाळ सकाळपासून विविध रंगांनी रंगल्याचे चित्र दिसत होते. नैसर्गिक रंगाचा वापर करत साताऱ्यातले बालचम्मू रंग खेळत होते. कोणी बाटलीत रंग बनवून तर कोणी पिच्कारीने रंग उडवून आंनद घेत होते. लहानग्यासोबतच मोठेही या रंगाच्या खेळात सहभागी झाले होते. शांततेत आनंदात उत्साहात हा सण शहरात साजरा करण्यात आला.