अजंठा चौक येथील फ्लायोवरच्या सुशोभीकरणाचा नारळ फुटला


दैनिक स्थैर्य । दि. १५ मार्च २०२३ । सातारा । अजंठा चौक येथील फ्लायओव्हरच्या सुशोभीकरणाचा नारळ खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते फोडण्यात आला . वीर जवान या संकल्पनेवर आधारित एक सुंदर डिझाईन या पुला . अंतर्गत जागेत तयार करण्यात येणार आहे यावेळी बोलताना हद्द वाढ क्षेत्रातील भागाला कधीही निधी कमी पडू देणार नाही पायाभूत सुविधा देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत अशी स्पष्ट ग्वाही उदयनराजे यांनी बोलताना दिली

सातारा शहराच्या हद्दवाढीतील क्षेत्रासाठी राज्य शासनाने 48 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे शहराच्या पूर्व भागांमध्ये विकास कामांचे नारळ फुटले यामध्ये अजंठा चौकातील फ्लायओव्हर अंर्तगत जागा सुशोभीकरणाचा कार्यक्रम अंतर्भूत होता यासंदर्भात उदयनराजे समर्थक संग्राम बर्गे यांनी या कामासाठी पुढाकार घेतला आहे . खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत शुक्रवारी या कार्यक्रमाचा नारळ फोडण्यात आला

यावेळी युवाशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष संग्राम बर्गे आबा शिंदे विठ्ठलराव जाधव संजय चव्हाण विक्रम पवार राहुल पाटोळे सुधीर भोसले सुरेश महाडिक नवनाथ इंदलकर सचिन घाडगे विशाल नलावडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना खासदार उदयनराजे भोसले म्हणाले आपला जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा आहे त्यांच्या स्मरणार्थ पुणे बेंगलोर नॅशनल हायवे येथे अजंठा चौक परिसरातील फ्लाय ओव्हर अंतर्गत येणाऱ्या भागात वीर जवान या संकल्पनेवर आधारित सुंदर डिझाईन बनवून एक स्मृती स्थळ तयार करण्यात येणार आहे विलासपूर संभाजीनगर कोडोली या पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना पायाभूत सुविधा देण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आहे येथे कुठल्याही कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही उदयनराजे भोसले यांनी दिली


Back to top button
Don`t copy text!