‘रंगात रंगले सारे..’ असे म्हणत शनिवारी रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संपूर्ण देशात होळीच्या वेळी रंग खेळण्याची परंपरा असली तरी महाराष्ट्रामध्ये होळीच्या पाचव्या दिवशी म्हणजेच रंगपंचमीला हा सण साजरा केला जातो. एकीकडे पाण्याची टंचाई जाणवत असताना लहान मुलांनीही एकमेकांना कोरडे रंग लावत या सणाचा आनंद लुटला. (छाया : अतुल देशपांडे, सातारा)