रानभाजी महोत्सावाचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्घाटन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १५ ऑगस्ट २०२२ । सातारा । रानभाज्या डोंगरी भागात तसेच बांधावर नैसर्गिंक रित्या उगवतात. ह्या भाज्या आरोग्यासाठी गुणकारक आहेत याचे महत्व शहरी भागातील नागरिकांना पटवून सांगा, असे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

कृषी विभागाच्यावतीने हॉटेल लेक व्हियू, सातारा याठिकाणी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, यशराज देसाई यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री. देसाई म्हणाले, शहरी भागातील नागरिकांना नैसर्गिकरित्या उगाविलेल्या रानभाज्यांचे महत्व समजावे तसेच शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी या उद्दशाने प्रत्येक वर्षी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. शेतकऱ्यांच्या हिताला शासनाने प्राधान्य दिल असून शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे सांगून रानभाजी महोत्सवाला शुभेच्छा ही दिल्या.


Back to top button
Don`t copy text!