रामसाहेब निंबाळकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा


दैनिक स्थैर्य । दि. २६ डिसेंबर २०२२ । फलटण । निंबळकचे सुपुत्र, प्रसिद्ध उद्योजक, श्री निमजाईदेवी इंडोमेन्ट ट्रस्टचे अध्यक्ष व राज इन्फ्रास्ट्रक्चरचे व्यवस्थापकीय संचालक रामसाहेब निंबाळकर यांचा वाढदिवस निंबळक येथे विविध उपक्रम राबवत साजरा करण्यात आला.

यावेळी निंबळक ग्रामस्थांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आला होता. त्याला ग्रामस्थांच्यासह पंचक्रोशीतील नागरिकांनी उस्फुर्त असा प्रतिसाद दिला. प्रत्येक रक्तदात्याला श्री भगवतगीता व मिठाईचे वाटप आयोजकांच्या वतीने करण्यात आले.

निंबळक येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये व न्यू इंग्लिश स्कुलमधील विद्यार्थ्यांना वही, पेन व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी रामसाहेब निंबाळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!