दैनिक स्थैर्य | दि. ३० एप्रिल २०२३ | फलटण | फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज मतदान होत आहे. सकाळच्या टप्प्यामध्ये विधानपरिषदेचे माजी सभापती व आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, बाजार समितीचे माजी सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी हक्क बजावला.
फलटण येथील नगपरिषदेच्या शाळा क्र. ८ येथे असणाऱ्या मतदान केंद्रावर विधानपरिषदेचे माजी सभापती व आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, बाजार समितीचे माजी सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत राजे गटाच्या विविध विकास सोसायटी व ग्रामपंचायत सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
यासोबतच फलटण तालुक्यात विविध ठिकाणी असणाऱ्या मतदान केंद्रावर सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव, निवडणूक निर्णय अधिकारी सुनील धायगुडे यांच्या मागर्दर्शनखाली विविध शासकीय अधिकारी कार्यरत आहेत.
उद्या सोमवार, दि. १ मे रोजी सकाळी १० वाजता फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुनील धायगुडे यांनी दिली.