दैनिक स्थैर्य | दि. १० नोव्हेंबर २०२४ | साखरवाडी | गत काही वर्षांपासून आम्ही एकत्रित काम करत असताना राज्याच्या राजकारणामध्ये तरुणांना संधी देण्यासाठी माझी पहिल्यापासूनची भूमिका होती. गत काही वर्षांपूर्वी संजीवराजे यांना विधान परिषदेवर संधी देण्याबाबत मी आग्रही होतो; परंतु त्यावेळी मला रामराजेंनी नकार कळवला होता त्यानंतर पक्षाच्या माध्यमातून शेखर गोरे यांना विधान परिषदेचे तिकीट दिले असल्याचे मत सुद्धा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी व्यक्त केले.
साखरवाडी बाजार तळावर आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तथा महायुतीचे फलटण विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत सभेमध्ये उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार बोलत होते. यावेळी खासदार नितीनकाका पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
राज्याच्या राजकारणामध्ये नवीन तरुणांची पिढी तयार होणे गरजेचे आहे. यासाठी कायमच मी आग्रही राहिलेलो आहे. राज्यातील अनेक नवीन चेहऱ्यांना किंवा नवीन तरुणांना संधी देण्यासाठी मी पहिल्यापासूनच प्रयत्नशील होतो. यामध्ये प्रामुख्याने उदाहरण द्यायचे झाले तर पुणे जिल्ह्यातील सुनील शेळके, दत्ता भरणे, बीड येथील धनंजय मुंडे, राजू नवघरे यांच्यासह अनेक उदाहरणे बघायला मिळतील. त्याचवेळी सातारा जिल्ह्यामधून संजीवराजे यांना विधान परिषदेवर घेण्याबाबत मी आग्रही होतो. परंतु त्यावेळी श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट नकार कळवल्याने शेखर गोरे यांना उमेदवारी द्यावी लागली; असे मत यावेळी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी व्यक्त केले.