दैनिक स्थैर्य | दि. 02 मे 2023 | फलटण | मी १९९९ पासून मा. शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वात काम करीत आहे. आज पुस्तक प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने आमच्या सारख्या सर्व कार्यकर्त्यांना मुंबई इथे बोलावले आहे. मा. शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वातच आम्ही कायम केले आहे आणि आगामी काळामध्ये सुद्धा करणार आहे. साहेब, काहीही झाले तरी तुम्हालाच पक्षाचे अध्यक्ष राहावे लागणार आहे. पक्षामध्ये जे बदल आहेत, ते तुम्ही केले तरी चालतील परंतु राष्टीय अध्यक्ष म्हणून तुम्हीच कार्यरत राहणे गरजेचे आहे; असे मत विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या लोक माझे सांगाती या आत्मकथेच्या दुसऱ्या भागाचं प्रकाशन आज झालं. यावेळी बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून मी आता बाजूला जाणार आहे; असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. त्यानंतर बोलताना विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते.
आता भाषणामध्ये साहेबांनी अध्यक्ष पद सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. साहेब, हा निर्णय राज्यासह देशातील कोणत्याच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पटणारा नाही. मा. अजित पवार दादा तुम्ही म्हणाला कि, आता भाकरी फिरवण्याचा निर्णय साहेबांनी घेतला आहे. आणि आगामी काळामध्ये जरी नूतन अध्यक्ष झाले तरी ते मा. शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे; या सर्व गोष्टी बरोबर असल्या तरी सुद्धा मा. शरद पवार साहेब यांनी अध्यक्ष पदावरून जाणे हे काही हे आमच्या सारख्या कारकर्त्याला मान्य नाही. मा. शरद पवार साहेबच पक्षाचे अध्यक्ष राहिले पाहिजेत, असे मत यावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केले.