दैनिक स्थैर्य | दि. 21 जुलै 2023 | फलटण | श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर इथे आहेत. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते आहेत. ते जेंव्हा सभापती पदावर कार्यरत होते; त्यांच्याकाळामध्ये जेंव्हा जेंव्हा पक्षाची बैठक आयोजित केली जात होती तेंव्हा म्हणजेच सभापती पदावर असताना श्रीमंत रामराजे कधीही पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहत नव्हते; हि सत्यता आहे. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभापती पदाचा मान व आदब राखण्याचा कायमच प्रयत्न केला आहे; असे मत आमदार शशिकांत शिंदे यांनी विधानपरिषदेत व्यक्त केले.
यावेळी बोलताना आमदार शशिकांत शिंदे म्हणाले कि, गेल्या दीड वर्षांपासून विधानपरिषद सभापती पदाचा निर्णय प्रलंबित आहे. हे निर्णय घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडे जावे लागत आहे; आणि कोर्ट पुन्हा ते आपल्या सभागृहाकडे पाठवत आहे. अध्यक्ष किंवा सभापती नसताना उपाध्यक्ष किंवा उपसभापती यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या विरोधात कोर्टात गेल्यावर अध्यक्ष निवडला गेले आहेत. मग तुम्ही अध्यक्ष किंवा सभापती यांची जागा रिक्त का ठेवत आहात ? या जागा वेळीच भरल्या असत्या तर हा मुद्दाच उपस्थित राहिला नसता. उपसभापती यांनी पक्षात प्रवेश केला म्हणून आम्ही हरकत घेतली आहे.