दैनिक स्थैर्य | दि. 01 मे 2023 | फलटण | फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीवर विधान परिषदेचे माजी सभापती व आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचाच करिष्मा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्रीराम पॅनल मध्ये असलेल्या सर्व 14 उमेदवारांचा विजय झाला आहे. तर पूर्वीच 4 उमेदवार बिनविरोध म्हणून निवडून गेले आहेत. विरोधी गटाचे पूर्ण पॅनल सुद्धा तयार झाले नव्हते परंतु लढलेल्या काही उमेदवारांचे डिपॉझिट सुद्धा जप्त झाल्याने विरोधक बाजार समितीमध्ये सुद्धा भुईसपाट झाले आहेत.
फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया काल दि. 30 एप्रिल रोजी संपन्न झाली. त्याची मतमोजणी आज, दि. 01 मे रोजी पार पडली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी सुनील धायगुडे यांनी निकाल जाहीर केला. यावेळी पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, निवडणूक निरीक्षक तथा तहसीलदार समीर यादव यांच्यासह विविध अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुक्यामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे पारंपरिक विरोधक असणारे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीने बाजार समितीमध्ये कोणताही सक्रिय सहभाग घेतला नव्हता. सत्ताधारी राजे गटाच्या विरोधी एकत्र करण्याचा प्रयत्न बाजार समितीच्या निवडणुकीत करण्यात आला होता. यामध्ये शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रीय समाज पक्ष यांनी एकत्रित येऊन बाजार समितीची निवडणूक लढवलेली होती. सर्व एकत्र येऊन सुद्धा एकही उमेदवार बाजार समितीवर विरोधकांचा निवडून आलेला नाही.
– असे असेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन संचालक मंडळ –
अक्षय गायकवाड – ग्रामपंचायत अनुसूचित जाती मतदारसंघ (बिनविरोध)
निलेश कापसे – हमाल मापाडी मतदारसंघ (बिनविरोध)
तुळशीदास शिंदे – सोसायटी इतर मागास मतदारसंघ (बिनविरोध)
संतोष जगताप – ग्रामपंचायत आर्थिक मागास मतदारसंघ (बिनविरोध)
श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर – सोसायटी मतदारसंघ
चेतन सुभाष शिंदे – सोसायटी मतदारसंघ
भगवान दादासो होळकर – सोसायटी मतदारसंघ
शंभूराज विनायकराव पाटील – सोसायटी मतदारसंघ
शरद लक्ष्मण लोखंडे – सोसायटी मतदारसंघ
ज्ञानदेव बाबासो गावडे – सोसायटी मतदारसंघ
दीपक विठोबा गौंड – सोसायटी मतदारसंघ
भीमराव पोपटराव खताळ – सोसायटी विजाभज मतदारसंघ
(शिवसेना तालुका प्रमुख नानासो उर्फ पिंटू इवरे यांचा पराभव)
सौ. सुनीता चंद्रकांत रणवरे – सोसायटी महिला मतदारसंघ
सौ. जयश्री गणपत सस्ते – सोसायटी महिला मतदारसंघ
किरण सयाजी शिंदे – ग्रामपंचायत मतदारसंघ
चांगदेव कृष्णा खरात – ग्रामपंचायत मतदारसंघ
(ग्रामपंचायत मतदारसंघातुन राष्ट्रीय समाज पक्षाचे जेष्ठ नेते काशिनाथ शेवते व शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख प्रदीप झणझणे यांचा पराभव.)
संजय हरिभाऊ कदम – व्यापारी मतदारसंघ
समर दिलीप जाधव – व्यापारी मतदारसंघ