कोरोना वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्याने रामजन्मोत्सव साध्या पद्धतीने; महाराष्ट्र विधान परिषद सभापती तथा ट्रस्टचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. २२: येथील पुरातन श्रीराम मंदिरात संस्थानकालीन परंपरेनुसार रामजन्मोत्सव व रामनवमी कार्यक्रम धार्मिक वातावरणात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्देशाप्रमाणे साध्या पद्धतीने संपन्न झाला.

श्रीमंत सगुणामाता आईसाहेब महाराज यांनी त्यांच्या सन १७७४ ते १७९४ या कालावधीत येथील गादीवर असताना येथे श्रीराम मंदिराची उभारणी केल्यापासून गेली सुमारे २२५ वर्षाहून अधिककाळ श्रीराम मंदिरात रामनवमी उत्सव प्रतीवर्षी परंपरागत पध्दतीने साजरा केला जातो. श्रीमंत सगुणामाता आईसाहेब महाराज यांनीच मुधोजी मनमोहन राजवाड्या शेजारी भव्य देखण्या श्रीराम मंदिराची उभारणी केली आहे.

रामनवमी उत्सवानिमित्त मानकरी वेलणकर कुटुंबातील अनिल वेलणकर व मान्यवरांनी मुधोजी मनमोहन राजवाड्यातून राजघराण्याच्या देवघरातील प्रभू श्रीरामाची मूर्ती आणून ती मंदिरातील प्रभू श्रीराम, सीतामातेला भेटविल्यानंतर महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्त्यजितराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे सुपूर्द केली त्यांनी सदर मूर्ती सजविलेल्या पाळण्यात ठेवल्यानंतर रामजन्माचा पाळणा उपस्थितांनी म्हंटला.

श्रीराम मंदिर फलटण, बालाजी मंदिर फलटण, श्रीराम मंदिर तरडगाव सह शहर व तालुक्यात प्रतिवर्षी रामनवमी उत्सव विविध धार्मिक कार्यक्रम उपक्रमाद्वारे साजरा केला जातो, श्रीराम मंदिरात रामायणावरील कीर्तन/प्रवचने अगोदर पासून सुरु असतात मात्र कोरोना वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी मंदिरे बंद असल्याने नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चरिटीज ट्रस्टचे अध्यक्ष व सदस्यांचे उपस्थितीत परंपरागत पूजा विधी करण्यात आले. देवस्थान ट्रस्टचे कारभारी दशरथ यादव यांनी स्वागत केले.


Back to top button
Don`t copy text!