
स्थैर्य, फलटण, दि. १० : फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाने थैमान घातलेले आहे. कोरोनावर उपचार मिळण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत आहे. हे सर्व होत असताना निंबळक गावातील नागरिकांसाठी निंबळक गावचे सुपुत्र व राज्यातील प्रसिद्ध उद्योजक राम निंबाळकर यांनी गावातील जे रुग्ण गृह विलीगीकरणामध्ये उपचार घेत आहेत, त्यांना लागणारे सर्व औषधे हि स्वखर्चाने पुरवणार आहेत. निंबळक गावातील ज्या कोरोनाबाधित रुग्णांना औषधांची आवश्यकता आहे त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी काशीराम मोरे (मो.बा.: 9822388000) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रसिद्ध उद्योजक राम निंबाळकर यांनी केलेले आहे.