
दैनिक स्थैर्य । दि. 11 मे 2025 । फलटण । पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची यंदाच्या वर्षी ३०० वी जयंती साजरी होत आहे. त्यानिमित्ताने फलटण शहरासह तालुक्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळी एकत्रित येत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या दिमाखात साजरी करण्यात येणार असल्याची माहिती संदीप चोरमले यांनी दिली.
कोळकी येथील शासकीय विश्रामगृहात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, तुकाराम शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर, रामभाऊ ढेकळे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदीप चोरमले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेवराव पोकळे, संजय गांधी निराधार योजनेचे फलटण तालुका अध्यक्ष बापूराव गावडे, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शिवसेनेचे तालुका प्रमुख नानासाहेब उर्फ पिंटू ईवरे, खंडेराव सरक, भाजपा तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव सोनवलकर, सौ. पूनम भिसे, शंकरराव लोखंडे, युवा उद्योजक अभिजीत जानकर, ऋषि बिचुकले, आबा बेंद्रे, श्रीरंग सोनवलकर, हनुमंत पाटील, महादेव सोनवलकर, अक्षय सोनवलकर, उत्तमराव सोनवलकर, विठ्ठल चोरमले, तुषार चोरमले, खंडेराव भिसे यांच्यासह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीच्या बाबत माहिती देताना चोरमले म्हणाले कि, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समितीची बैठक सर्व प्रमूख समाज बंधवांच्या उपस्थितीत संपन्न झाली. ही जयंती ३०० वी असलेने या जयंतीस विशेष महत्व आहे. जयंती सर्व समावेशक एकत्रित स्वरूपात पारंपारिक पद्धतीने साजरी होणार आहे. या जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रम चौकामध्ये आकर्षक सजावट भव्य स्वागत कमान गझीनृत्य, लेझीम, झाँजपथक, आकर्षक डीजे लाइट्स, हलगी पथक, घोडे, आकर्षक दारूगोळा, बाईक रॅली, रक्तदान शिबिर संपन्न होणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची भव्य शाही मिरवणूक होणार असून या पारंपारिक मिरवणुकी मध्ये सर्वांनी सामील व्हावे, असे जयंती समितीच्या वतीने आवाहन करणेत आले आहे. दि. ३१ मे रोजी जयंती आहे; त्या दिवशी अभिषेक आणि पूजा व अभिवादन संपन्न होणार आहे तर दि. ०१ जुन रोजी मिरवणूक संपन्न होणार आहे.