दैनिक स्थैर्य । दि. ०२ सप्टेंबर २०२२ । बारामती । बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन च्या वतीने बारामती परिसरातील उद्योजकांसाठी राजकोट गुजरात येथे आयोजित करण्यात आलेल्या राजकोट मशीन टूल प्रदर्शन हे औद्योगिक मशिनरी प्रदर्शन पाहण्यासाठी 20 ते 24 सप्टेंबर दरम्यान अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती अध्यक्ष धनंजय जामदार यांनी दिली.
गुजरात मधील राजकोट देशातील यंत्रसामुग्रीचे प्रमुख उत्पादन केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण लहान मोठ्या मशिनरी प्रदर्शनात एकाच ठिकाणी पाहण्याची संधी उद्योजकांना उपलब्ध झाली आहे. देशातील प्रमुख मशिनरी उत्पादकांबरोबरच परदेशी कंपन्या देखील या सहभागी होणार असल्याने जागतिक दर्जाच्या यंत्रसामुग्री उद्योजकांना पाहायला मिळणार आहे.
बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन च्या नेतृत्वाखालील उद्योजकांचे शिष्टमंडळ 20 सप्टेंबर 2022 रोजी राजकोट कडे रवाना होणार असून दोन दिवस प्रदर्शन पाहून त्या परिसरातील प्रेक्षणीय स्थळांना भेटी देणार आहेत. प्रस्थापित उद्योजकांबरोबरच उद्योगांची विस्तार वाढ करणारे व नवीन उद्योजकांना हे प्रदर्शन अत्यंत उपयुक्त ठरणार असून याचा लाभ घेण्याचे आवाहन धनंजय जामदार यांनी केले आहे.
या अभ्यास दौर्यात मध्ये सहभागी व्हायचे असल्यास बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे सचिव अनंत अवचट यांच्याशी 7304715155 या क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदवावे असे आवाहन अध्यक्ष धनंजय जामदार यांनी केले आहे.