गणेशोत्सवानिमित्त सातारा शहरातील वाहतुकीत बदल


दैनिक स्थैर्य । दि. ०२ सप्टेंबर २०२२ । सातारा । गणेशोत्सव कालावधीत सार्वजनिक  गणेशोत्सव मंडळाकडून विद्युत रोषणाई, देखावे तयार केले जातात. हे देखावे पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी 1951 चे कलम 34 अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारान्वये गणेशोत्सव कालावधीत 9 सप्टेंबर 2022 च्या रात्री 24.00 पर्यंत खालील प्रमाणे तात्पुरते बदल करण्यात आले आहे.

वाहतूक मार्गातील तात्पुरते बदल : राजवाड्याकडून मौती चौक मार्गे समर्थ टॉकीजकडे वाहनांसाठी मार्ग राहील. परंतु समर्थ टॉकीजकडून मोती चौकाकडे येणारी वाहने एम.एस.ई.बी. ऑफिसकडून सुरुची बंगला आर्याग्ल हॉस्पिटल मार्गे रवाना होतील. (मौती चौक ते एम.एस.ई.बी. हा रोड एकेरी वाहतुकीसाठी वापरण्यात येणार आहे.) मारवाडी चौक ते सम्राट चौक या रस्त्यावर सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.

वाहनांचे पार्किंगबाबत : मौती चौक ते जुना मोटार स्टँड या रोड दरम्यान रस्त्याचे दक्षिण बाजूस वाहने पार्किंग करावीत. शेटे चौक राजाराम भुवन पर्यंत रस्त्याचे उत्तर बाजूस वाहने पार्किंग करावीत. मौती चौक ते राधिका टॉकिज या रोडवर वाहने पश्चिम बाजूस पार्किंग करावीत. मोती चौक ते देवीचौक या रोडवर रस्त्याचे उत्तर बाजूस वाहने पार्किंग करावीत. प्रिया व्हारायटीज कॉर्नर ते कासट मार्केट या रोडदरम्यान दक्षिस बाजूस वाहने पार्किंग करावीत. तसेच मौती चौक ते समर्थ टॉकिज व मौती चौक ते शेटे चौक दरम्यान रोडच्या कडेला राहणाऱ्या नागरिकांनी व व्यापारी लोकांनी आपल्या मालकीची वाहने रोडवर पार्किंग न करता पर्यायी जागेमध्ये पार्कींग करावीत.


Back to top button
Don`t copy text!