तडवळे विकास सोसायटीचे चेअरमन राजेश खराडे यांनी वाढदिवसानिमित्त केले मास्क व सॅनिटायझरचे वाटप


स्थैर्य, फलटण : तडवळे गावचे सुपुञ व तडवळे वि.का.स. सोसायटीचे चेअरमन राजेश खराडे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये करोना या महाभयंकर आजराच्या प्रतिबंधासाठी मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले. त्या बद्दल त्यांचे शाळा व्यवस्थापन समितीमार्फत आभार मानण्यात आले व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शाळा व्यवस्थापन समिती मार्फ़त शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल खराडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शामराव गाढवे, भारत गाढवे, एन.डी गाढवे, नंदकुमार गाढवे, शेखर खराडे, विष्णू भंडलकर, वसीम इनामदार तसेच शाळेचे मुख्याध्यापक अरुण पवार व त्यांचे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!