
स्थैर्य, वडले, दि. २६ ऑगस्ट : वडले (ता. फलटण) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी आनंदराव सोनवलकर आणि व्हाईस चेअरमनपदी बबन शेंडगे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीमुळे सोसायटीवर राजे गटाचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
वडले विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीनंतर झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदासाठी अनुक्रमे आनंदराव सोनवलकर आणि बबन शेंडगे यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले.
या निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दिपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर आणि पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. वडले येथील राजे गटाच्या कार्यकर्त्यांनीही या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला आहे.