तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राजे गट कटिबद्ध : श्रीमंत विश्वजीतराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०५ फेब्रुवारी २०२२ । फलटण । जिल्हा पशुसंवर्धन विभाग व पंचायत समिती फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने पशुपालक व शेतकरी वर्गासाठी कामधेनू दत्तक ग्राम योजनेत “सरडे” गावचा समावेश करून या गावातील शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेले मार्गदर्शन शिबिर हा अतिशय उपयुक्त उपक्रम राबविण्यात आला असून सरडे गावातील शेतकरी वर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन फलटण पंचायत समिती चे सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद सातारा व पंचायत समिती फलटण यांच्या वतीने कामधेनू दत्तक ग्राम योजनेतंर्गत सरडे येथे वंध्यत्व निवारण गोचीड गोमाशा निमुर्लन क्षार मिश्रण व चारा बियाणे वाटप मार्गदर्शन शिबीराच्या उद्घाटनाच्यावेळी श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभाग डॉ. पवार, पंचायत समिती विस्तार अधिकारी डॉ. नंदकुमार फाळके, डॉ. पोपट मोरकाने, सरपंच सौ. पूनम चव्हाण, उपसरपंच महादेव विरकर, श्रीराम कारखान्याचे संचालक सुखदेव बेलदार, माजी सरपंच दत्ता भोसले, महादेव चव्हाण, पशुपालक संघाचे अध्यक्ष हरिभाऊ शेंडगे यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

सरडे गावचे आणि आमच्या राजेघराण्याचे पिढ्यानपिढ्याचे संबंध असल्याने या गावात सभापती म्हणून नाही तर त्यांचा नातू म्हणून आलो आहे. समाजकार्याच्या माध्यमातून या गावातील घरकुल वीज व शिक्षणाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहे ज्या शेतकऱ्यांना जादा लाईट बील आले आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये संपर्क साधावा आपण लाईट बील कमी करण्यासाठी प्रयत्न करु अशी ग्वाही, श्रीमंत विश्वजीतराजे यांनी दिली.

फलटण पंचायत समितीच्या माध्यमातून लोकाभिमुख कारभार सुरु आहे पशुसंवर्धन विभागाचे काम अत्यंत चांगले व जनतेच्या हिताचे आहे अशा उपक्रमांना आपण नेहमीच पाठबळ देणार असल्याचे सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

प्रारंभी दिपप्रज्वलन व देशी गाईचे पूजन श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पूजन केले. शिबीराचे उदघाटन करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत सरपंच सौ. पूनम चव्हाण यांनी केले. प्रास्ताविक माजी सरपंच दत्ता भोसले यांनी केले तर आभार महादेव विरकर व डॉ बी. एन. एन. झावरे यांनी मानले. या प्रसंगी सहाय्यक आयुक्त डॉ. विजय पवार व डॉ. गणेश नेवसे, सुखदेव बेलदार यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी डॉ. सुरेश गावडे, नंदू भोसले, सी. टी. भोसले, डॉ. मोरकाने, विजय कदम, डॉ. राजमाने, डॉ. वैभव पोंदुकले, डॉ. नौशाद तांबोळी, डॉ. जया फडतरे, ग्रामपंचायत सदस्य राजूभाई शेख, सचिन बेलदार, नवनाथ धायगुडे, संजय जाधव, हणमंत बेलदार, विठ्ठल बेलदार, राजाराम बेलदार, कांतीलाल हराळे, भालचंद्र चव्हाण, धोंडीराम शेंडगे, राजकुमार शेंडगे, सत्यवान धायगुडे, हुसेन शेख, नाना शेंडगे, बापूसाहेब शेंडगे, शत्रुघ्न भोसले, विष्णू भोसले, अनिल बेलदार, भानुदास शेंडगे, पोलीस पाटील मनोज मोरे, मारुती चव्हाण, ग्रामविस्तार अधिकारी शिवाजी गाढवे, निलेश बुरूंगले, बोराटे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर जिल्हा परिषद शाळा सरडे गावठाण येथे माजी उपसभापती सुरेश बेलदार, राजकुमार शेंडगे व धोंडीराम शेंडगे यांच्या निवासस्थानी श्रीमंत विश्वजितराजे यांनी सदिच्छा भेट दिली.


Back to top button
Don`t copy text!