दैनिक स्थैर्य । दि.०३ मे २०२२ । कोल्हापूर । समाज उद्धारक, सामान्यांप्रति कळवळा, पुरोगामी विचारसरणीचे आचरण तसेच अनेक क्रांतिकारी निर्णय व योजना सुरु करणाऱ्या लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे सर्वच क्षेत्रातील कार्य अद्वितीय असल्याचे गौरवोद्धगार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी छत्रपती शाहू मिल येथील चित्र प्रदर्शन पहाणी प्रसंगी काढले.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी पर्वानिमित्त येथील शाहू मिल येथे चित्र पदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या चित्र प्रदर्शनास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी राहुल रेखावार उपस्थित होते.
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी चित्र प्रदर्शनाची सविस्तर माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना दिली.
शाहू महाराजांच्या जीवनावरील अनेक प्रसंग चित्र प्रदर्शनातून उत्कृष्टपणे मांडण्यात आले आहे. शाहू मिल या ऐतिहासिक वास्तू मध्ये भरविण्यात आलेले छायाचित्र प्रदर्शन सर्वांनी पहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. ६ मे रोजी सकाळी १० वाजता लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना 100 सेकंद आदरांजली वाहण्यात येणार आहे. प्रत्येकाने या कार्यक्रमात सहभागी होऊन लोकराजाला आदरांजली वहावी, असे आवाहनही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.