दैनिक स्थैर्य । दि. १७ एप्रिल २०२३ । बारामती । विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता, आवड, कल पाहून करिअर निवडा तरच विद्यार्थ्यांना जीवनात यश मिळेल असे प्रतिपादन करिअर मार्गदर्शक डॉ संतोष मचाले यांनी केले.
राज पॅटर्न बारामती यांच्या वतीने गुणवंत (रविवार १६ एप्रिल२०२३) विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ प्रसंगी डॉ मचाले बोलत होते.
या प्रसंगी बारामती तालुका फेडरेशन चे अध्यक्ष तानाजीराव कर्चे, आनंद विद्यालय होळ च्या प्राचार्या हेमलता कर्चे, कृष्णाई इंटरनॅशनल स्कुल च्या प्राचार्या स्मिता पाटील, राज पॅटर्न चे संस्थापक प्रा शिवाजी मोरे, संचालक प्रो सागर मोरे, व इतर मान्यवर उपस्तीत होते.
गुणवता व दर्जा देत विद्यार्थी शिक्षण देत सराव करून घेतो त्यामुळेच विद्यार्थी दिखाऊ न राहता टिकाऊ राहतो व जीवनात यशस्वी होत असल्याचे प्रा सागर मोरे यांनी प्रास्ताविक मध्ये सांगितले.
मंथन परीक्षेतील चिराग मेटकरी, मनीष माने, कृष्णा आढाव व अकॅडमी मधील गुणवंत विद्यार्थी वेदिका मोरे, शिवराज शिंदे, सुयोग जरड, शंभूराजे घाडगे, कृष्णराज बाबर व एन एम एम एस परीक्षा मधील विद्यार्थी आर्यन यादव, समृद्धी मोहिते, ऋषिकेश माने, साहिल माने, सोहम नींबाळकर,सूरज पवार, सार्थक रुपणवर, दहावी मधील गौरी आटोळे तर होमिबाबा परीक्षा मधील गौरव बोरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी पदी नियुक्ती झाले बदल आरती पवार तर सैनिक स्कुल परीक्षेत राज्यात पहिला आलेबद्दल सोहम शिंदे आणि सैनिक स्कुल मध्ये उत्तीर्ण होऊन प्रवेश मिळल्याबद्दल ओम कांबळे, रेवती भोसले, कार्तिक जाधव, सिद्धांत मोरे, अर्णव नावडकर
आदी विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. उपस्तितांचे स्वागत प्रा शिवाजी मोरे यांनी केले तर सूत्रसंचालन श्री सावळेपाटील यांनी केले.