दैनिक स्थैर्य | दि. २ जुलै २०२४ | फलटण |
मान्सूनपूर्व पावसाने दिलासा दिल्यामुळे फलटण तालुक्यातील चारा, पाणीटंचाई कमी झाली, त्यापेक्षा पाटबंधारे खात्याचे नियोजन फसल्यामुळे उभ्या उसाचे क्षेत्र जळण्याचा धोका टळला असताना आता धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसास समाधानकारक नसली तरी सुरूवात झाली आहे, धरणे नक्की भरतील, अशी अपेक्षा आहे.
आज, मंगळवार दि.२ जुलै रोजी संपलेल्या २४ तासात धरण क्षेत्रात झालेला पाऊस, एकूण पाऊस आणि धरणातील पाणीसाठे खालीलप्रमाणे आहेत.
गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ४८ मि.मी., एकूण ३७४ मि.मी. पाऊस झाला असून धरणात १७ % पाणीसाठा झाला आहे.
भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ११ मि.मी., एकूण १८८ मि.मी. पाऊस झाला असून धरणात ११.३२% पाणीसाठा झाला आहे.
नीरा – देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २१ मि.मी., एकूण २४४ मि.मी. पाऊस झाला असून धरणात ११.५९ % पाणीसाठा झाला आहे.
वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ० मि.मी., एकूण १२३ मि.मी. पाऊस झाला असून धरणात २२.५६ % पाणीसाठा झाला आहे.
धोम – बलकवडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ६१ मि.मी., एकूण ४७२ मि.मी. पाऊस झाला असून धरणात ३.८७ % पाणीसाठा झाला आहे.