जिल्ह्यातील तीन जुगार अड्ड्यांवर छापे

दैनिक स्थैर्य । दि. २८ ऑगस्ट २०२२ । सातारा । जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या तीन जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापे टाकले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साबळेवाडी तालुका सातारा गावच्या हद्दीत एका पडक्या घराच्या आडोशास सुजित सदाशिव आवळे वय 31, राहणार बुधवार पेठ, सातारा हा जुगार घेताना आढळून आला. त्याच्याकडून सातशे रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
दुसऱ्या घटनेत जुना मोटर स्टॅन्ड येथील मंडईच्या पाठीमागे असणाऱ्या मोकळ्या घोड्यांच्या आडोशाला गणेश शिवाजी जाधव वय 42 राहणार आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा हा जुगार घेताना आढळून आला. त्याच्याकडून 3520 रुपये आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले.
तिसऱ्या घटनेत कुसुर तालुका कराड गावच्या हद्दीत विश्वनाथ बबन खोत वय 50, राहणार कोळेवाडी, तालुका कराड हे जुगार घेताना आढळून आले. त्यांच्याकडून 840 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.