स्थैर्य, श्रीनगर, दि २१: श्रीनगरमधील कृष्णा ढाब्यावर झालेल्या हल्ल्यातील मास्टरमाइंडला अटक केल्यानंतर पोलिस आणि सैन्याने अनंतनागच्या जंगलातील दहशतवादी ठिकाणांचा खुलासा केला आहे. जॉइंट ऑपरेशनमध्ये सुरक्षा दलाने अनंतनागच्या जंगलतून तीन एके-56 रायफल, दोन चीनी पिस्तुल, दोन चीनी ग्रेनेड, एक दूरबीन, सहा AK मॅगजीनसह इतर सामान जप्त केले आङे. तिकडे, जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवादी घटना वाढण्याच्या संशयातून घाटीत सुरक्षा वाढवली आहे.
उंच इमारतींवर स्नायपर्स तैनात केले जातील
काश्मीरचे IG विजय कुमार यांनी आदेश जारी करुन सर्व महत्वाच्या ठिकाणांवर सुरक्षा वाढवण्यास सांगितले आहे. त्यांनी याबाबत सांगितले की, काश्मीरच्या सर्व उंच इमारतींवर स्नायपर्स तैनात केले आहेत. पर्मानंट बंकरांची जागीही बदलण्यात आली आहे. याशिवाय पूर्ण घाटीत अँटी टेररिस्ट ऑपरेशंस वाढवले जातील.
दोन दिवसांपूर्वी पोलिसांवर हल्ला झाला होता
दोन दिवसांपूर्वी श्रीनगरच्या एका बाजारात दहशतवाद्यांनी पोलिसांच्या तुकडीवर हल्ला केला होता. येथील बागत बारजुल्ला परिसरात दहशतवाद्याने दिवसा ढवळ्या AK-47 ने सुरक्षा दलावर गोळीबार केला होता. यात दोन पोलिस कर्मचारी शहीद झाले होते.