साताऱ्यात जुगार अड्ड्यावर छापा; नऊ जणांवर गुन्हा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.३ : येथील पोवई नाक्यावरील दुध डेअरी परिसरातील जुगार अड्ड्यावर सातारा उपविभागीय कार्यालयाच्या पथकाने छापा टाकला. याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संतोष दिलीप मतकर (वय ३२, रा.मंगळवार पेठ), अक्षय वाघमारे (वय २४, रा.जगतापवाडी, शाहूनगर), अमर चंद्रकांत जाधव (वय ३२,रा.शाहूपुरी), सुमित परशुराम बनसोडे (वय २२, रा.म्हसवे ता.सातारा), अक्षय नंदू जाधव (वय २३, रा.करंजे पेठ), अक्षय संजय जाधव (वय २३, रा.रविवार पेठ), फिरोज युनुस पठाण (वय ५०, रा.सदरबझार), सुभाष वसंत मोरे (वय ४५, रा.बेबलेवाडी ता.सातारा), जीवन कृष्ण काळे (वय ४२, रा.करंजे पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सातारा कॅफे व दुध डेअरी परिसरात एक जानेवारी रोजी सायंकाळी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सातारा उपविभागीय कार्यालयातील पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पथक तयार केले व घटनास्थळी छापा टाकला.


Back to top button
Don`t copy text!