साताऱ्यात जुगार अड्ड्यावर छापा; 8 जणांवर गुन्हा


स्थैर्य, सातारा, दि. ०८ : साताऱ्यातील गुरुवार परज येथे पोलिसांनी छापा टाकून जुगार अड्डा उध्वस्त केला. या कारवाईत पोलिसांनी 8 जणांवर गुन्हा दाखल केला असून संशयितांकडून 1 लाख 53 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, ताब्यात घेतलेले सर्व संशयित साताऱ्यातील आहेत.

आकाश सुनील चोरगे (वय 27, रा.रविवार पेठ), सईद जावेद कोतवाल (वय 30, रा.राजसपुरा पेठ), राहूल प्रकाश घाडगे (वय 30, रा.रविवार पेठ), परेश जबार शेख (वय 39, रा.गुरुवार परज), सतिश संपत बोधे (वय 50, रा.खेड), अजय बबन कोरडे (वय 36, रा.रा.गुरुवार परज), रियाज उस्मान शेख (वय 50, रा.गुरुवार परज), दस्तगीर इसाक शेख (वय 53, रा.खेड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहेे. पोलिसांची धाड पडल्यानंतर संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. घटनास्थळाचा पंचनामा केला असता तेथून रोकड, जुगाराचे साहित्य, मोबाईल असा सुमारे 1 लाख 53 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!