सातार्‍यात तीन ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ जुलै २०२१ । सातारा । गेल्या दोन दिवसांत तीन जुगार अड्ड्यांवर शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकून जुगारअड्डा चालकांवर कारवाई केली. या कारवाईत 17 जणांवर गुन्हा दाखल झाला असून 41 हजारांची रोकड आणि सहा मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. यापैकी सर्वात मोठी कारवाई राजधानी टावर्स परिसरात झाली असून अन्य दोन कारवाया काशी विश्‍वेश्‍वर मंदीर आणि सोनीची गिरणी परिसरात झाल्या आहेत.

सातारा शहरातील राजधानी टॉवर्समधील पार्किंगच्या शेजारी असणार्‍या जिन्याच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकला. याप्रकरणी पोलिसांनी मटका व्यवसायिक नरेश जांभळे याच्यासह 13 जणांवर गुन्हा दाखल केला असून या कारवाईत 34 हजार 219 रुपयांची रोकड आणि पाच मोबाईल तसेच जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. दरम्यान, शाहूपुरी पोलिसांनी ज्या 13 जणांवर गुन्हा दाखल केला आहे ते स्वत:च्या आर्थिक फायद्याकरिता लोकांच्याकडून आकड्यावर पैज म्हणून पैसे स्वीकारुन जुगार चालवत होते, असे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.

सतीश महादेव शेडगे (वय 49, रा. गडकर आळी, सातारा), पापा गेणू गवळी (वय 36, रा. प्रतापसिंहनगर, खेड, सातारा), तेजस मधूकर देशमुख (वय 30, रा. बॉम्बे रेस्टॉरंट), नरेश धर्मराज जांभळे (वय 44, रा. ढोणे कॉलनी, मंगळवार पेठ, सातारा) सुभाष बाळू गिरी (वय 51, रा. व्यंकटपूरा पेठ, सातारा), शंकर दादासाहेब चव्हाण (वय 49, रा. मंगळवार पेठ, सातारा), श्रीकांत सखाराम संकपाळ (वय 59, रा. शनिवार पेठ, सातारा), रमेश कालिदास धुमाळ (वय 58, रा. मंगळवार पेठ, सातारा), दिनकर कोंडिबा वारागडे (वय 54, रा. पावर हाऊस झोपडपट्टी, बोगदा, मंगळवार पेठ, सातारा), संतकुमार सुखलाल पासवान (वय 26, रा. सोमवार पेठ, सातारा), राहूल सतीश जमदाडे (वय 36, रा. सोमवार पेठ, सातारा), निलेश बबन सकटे (वय 30, रा. शहापूर, ता. सातारा), बाळू कोंडिबा ढेबे (वय 49, रा. चिपळूणकर बागेजवळ, मंगळवार पेठ, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्या 13 जणांची नावे आहेत.

हे सर्वजण स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी लोकांच्याकडून आकड्यावर पैज म्हणून पैसे स्वीकारुन जुगार चालवत होते. ही बाब लक्षात आल्यानंतर या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याबरोबरच मटका व्यवसायिक नरेश जांभळे याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. या सर्वांना प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे.
दरम्यान, शाहूपूरी पोलिसांनी काशी विश्‍वेश्‍वर मंदीर परिसर आणि सोन्याची गिरणीजवळ सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला आहे. या कारवाईत चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. सातार्‍यातील मंगळवार पेठेतील राजस चौकाजवळील सोन्याच्या गिरणीजवळ सूरु असलेल्या जुगार अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकून 6 हजार 494 रुपयांची रोकड, एक मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी विशाल यशवंत पिलावरे (रा. जंगीवाडा, मंगळवार पेठ, सातारा), जुगारअड्डा मालक मालक देवेंद्र ढोणे (रा. मंगळवार पेठ, सातारा) या दोघांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना सीआरपीसी अंतर्गत प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबतची तक्रार पोलीस नाईक स्वप्नील कुंभार (वय 33) यांनी दिली आहे.

सातार्‍यातील काशीविश्‍वेश्‍वर मंदीर परिसरात सुरु असलेल्या जुगार अडड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकून निलेश गुलाबराव शिंदे (रा. मंगळवार पेठ, सातारा), यासीन शेख (रा. गुरुवार पेठ, सातारा) या दोघांवर कारवाई केली आहे. या दोघांनाही प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे. या कारवाईत 510 रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. याबाबतची तक्रार पोलीस कॉन्स्टेबल ओकांर यादव यांनी दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Back to top button
Don`t copy text!