तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा, ३६,८०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात


स्थैर्य, सातारा, दि. 23 : पाडळी (ता. सातारा) येथे चोरून सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर बोरगाव पोलिसांनी छापा टाकून चार जणाना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ३६,८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी पाडळी येथील मातंगवस्ती मधील लक्ष्मीआई मंदिरा समोर काही जण पैसे लावून तीन पानी जुगार खेळत असल्याची माहिती बोरगाव पोलिसांना मिळाली.यावेळी बोरगाव पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला असता काही इसम मोकळ्या शेडमध्ये पेपर टाकून दोन दोन जणांचे ग्रुप करून जुगार खेळताना आढळून आले.

यावेळी पोलिसांनी नितीन देशमुख (वय.३०), कुलदीप ढाणे (वय.३८), उद्धव खवळे (वय.३७),रोहित वरक (वय.२०, सर्व रा.पाडळी) यांना ताब्यात घेतले.पोलिसांनी त्यांच्याकडून रोख ५६०० रुपये, ३ मोबाइल हँडसेट, पत्याची पाने असा एकूण ३६,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत त्यांच्यावर सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख, मार्गदर्शनाखाली सपोनि डॉ. सागर वाघ, हवालदार मनोहर सुर्वे, किरण निकम, विजय साळुंखे, विशाल जाधव यांनी केली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!