दैनिक स्थैर्य | दि. २ डिसेंबर २०२४ | फलटण |
खामगाव (ता. फलटण) येथे पोलिसांनी आज दुपारी १२.४५ वाजता टाकलेल्या छाप्यात बेकायदा विक्रीसाठी आणलेली हातभट्टीची दारू सुमारे २१० लिटर फलटण ग्रामीण पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणी हा दारू अड्डा चालविणारे मनिषा प्रशांत कर्मावत व प्रशांत शेरू कर्मावत (दोघेही रा. खामगाव) या दोघा पती-पत्नीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कर्मावत दाम्पत्याने आपल्या राहत्या घराच्या पाठीमागे मोकळ्या जागेत ही बेकायदा हातभट्टीची दारू २१० लिटर, किंमत रुपये १०,५००/- ची विक्री करण्यासाठी जेजुरी भागातून आणली होती.
पुढील तपास स.पो.फौ. हजारे करत आहेत.