दैनिक स्थैर्य | दि. १ सप्टेंबर २०२३ | फलटण |
खामगाव (साखरवाडी, ता. फलटण) गावच्या हद्दीत दि. ३१ ऑगस्ट रोजी घराच्या आडोशाला बेकायदा दारूधंद्यावर फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून १ हजार ५० रूपयांची देशी दारू असलेल्या पंधरा सीलबंद काचेच्या बाटल्या जप्त केल्या व हा धंदा करणार्या हनुमान केज राठोड (वय २३, रा. साखरवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार हांगे करत आहेत.