दैनिक स्थैर्य । दि.०५ फेब्रुवारी २०२२ । सातारा । जिल्ह्यात दोन विविध ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार अड्डयांबाबत स्थानिकांकडून माहिती मिळताच त्यावर कारवाई करत पोलिसांनी २ हजार ४० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी पाचवड ता. वाई गावच्या हद्दीत पाचवड बाजार पाठीमागील हॉटेलच्या आडोशाला अतुल रमेश खटावकर रा. कुडाळ ता. जावली याच्याकडून १ हजार ४२५ रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले.