
दैनिक स्थैर्य । दि. २२ जुलै २०२१ । सातारा । सदर बझारमधील आजाद चौक येथील पत्र्याच्या शेडच्या आडोशाला सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर सातारा शहर पोलिसांनी छापा टाकून एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 560 रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली आहे. किरण रविंद्र तपासे (वय 27, रा. गुरुवार पेठ सातारा) असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्यावर महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ नुसार सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.