
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, सातारा, दि.२२: येथील गुरुवार परज परिसरातील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून एकावर गुन्हा दाखल केला. सौरभ शंकर जाधव वय 22 केसरकर पेठ, सातारा असे संशयिताचे नाव आहे. संशयीत गुरुवार परज येथील पिंपळाच्या झाडाशेजारी पत्र्याच्या टपरीच्या आडोशाला जुगाराचा अड्डा चालवत होता. त्याच्याकडून 1130 रुपयांचे जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
