प्रभाग क्र. १३ मधून राहुल निंबाळकर यांची प्रबळ दावेदारी; विकासकामांच्या जोरावर जनतेतून मागणी


स्थैर्य, फलटण, दि. 7 नोव्हेंबर : फलटण नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक १३ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष राहुल निंबाळकर यांची उमेदवारी प्रबळ मानली जात आहे. गेल्या १० वर्षांपासून सातत्याने केलेल्या सामाजिक कार्यामुळे आणि थेट जनसंपर्कामुळे त्यांच्या नावाला मतदारांमधून पसंती मिळत आहे.

राहुल निंबाळकर हे नागरिकांच्या हाकेला धावून जाणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. प्रभागातील गटारे तुंबली असोत, पाण्याची समस्या असो किंवा एखादे मृत जनावर पडलेले असो, निंबाळकर वेळप्रसंगी स्वतः उपस्थित राहून ही कामे तातडीने मार्गी लावतात.

नागरिकांना नगरपालिकेतून आवश्यक दाखले मिळवून देणे किंवा इतर प्रशासकीय कामांसाठी ते नेहमीच तत्पर असतात. पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून पाठपुरावा करून ते नागरिकांची कामे पूर्ण करून घेतात.

त्यांनी आपल्या प्रभागातील हडको कॉलनी परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसवणे, रस्ते तयार करणे, बंदिस्त गटारे बांधणे आणि पाण्याच्या नवीन लाईन्स टाकणे अशी अनेक मूलभूत विकासकामे पूर्ण केली आहेत.

सामाजिक कार्यासोबतच धार्मिक कार्यातही त्यांचा पुढाकार असतो. श्री सिद्धिविनायक मंदिर आणि विद्यानगर येथील दक्षिणमुखी मारुती मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

त्यांनी केलेल्या या विविध छोट्या-मोठ्या कामांमुळे प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिकांमधूनच त्यांच्या उमेदवारीची जोरदार मागणी होत आहे.


Back to top button
Don`t copy text!