फलटण एस.टी. सोसायटीचे चेअरमन राहुल कदम यांचे निधन


स्थैर्य, फलटण, दि. ३० : फलटण आगार एस.टी. को. ऑप. सोसायटिचे चेअरमन राहुल कालीदास कदम यांचे कोरोना मुळे निधन झाले. ते ४१ वर्षांचे होते. त्याच्यां पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परीवार आहे. फलटण आगारात ते चालक पदावर कार्यरत होते. नुकतीच त्यांची वाहन परीक्षक म्हणुन बढतीवर दहिवडी आगारात बदली झालेली होती. एस.टी.सोसायटीचे चेअरमन, कामगार संघटनेचे खजिनदार पदावर ते कार्यरत होते. त्याच्यां अकस्मीत निधनाने फलटण आगारावर शोककळा पसरली होती. त्यांचे मुळ गाव राजाळे होते. त्यांनी फलटण – अक्कलकोट, फलटण – बारामती मार्गावर विशेष कामगीरी केली.


Back to top button
Don`t copy text!