दैनिक स्थैर्य | दि. १२ सप्टेंबर २०२४ | फलटण | सध्या सर्वत्र गणेश उत्सवाची धामधूम सुरु आहे. श्री गणरायाचे आगमन झाल्यापासून सर्वत्र प्रसन्न वातावरण आहे. यामध्ये यंदाच्या विसर्जन मिरणुकीत कोणत्याही गणेश उत्सव मंडळांनी डीजे किंवा कर्णकर्कश आवाज असणाऱ्या साउंड सिस्टीम लावू नयेत; असे स्पष्ट आदेश फलटण उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांनी दिले आहेत.
फलटण येथील श्री गणेश उत्सव मंडळांची बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी धस बोलत होते.
फलटण शहरासह तालुक्यातील जो गणेश उत्सव आहे. तो अतिशय जल्लोषात परंतु कायद्याच्या चौकटीत राहूनच साजरा करायचा आहे. गणेश उत्सव साजरा करत असताना कोणीही डीजे किंवा कोणत्याही प्रकारचे कर्णकर्कश आवाज असणाऱ्या साउंड सिस्टीम लावण्यात येऊ नयेत. जी मंडळे कायदा पाळणार नाहीत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे; असे मत पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांनी व्यक्त केले.