दैनिक स्थैर्य । दि. २७ सप्टेंबर २०२२ । फलटण । राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या सौ. राहिबाई पोपरे यांनी नुकतील फलटण तालुक्यातील कापडगावला सदिच्छा भेट दिली.
लोणंद ता. खंडाळा येथील रयत संकुलाच्यावतीने आयोजित करणेत आलेल्या कर्मवीर जयंती कार्यक्रमाच्या सभेच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या व्याख्यात्या म्हणून बिजमाता म्हणून ओळखल्या जाणार्या सौ. राहीबाई सोमा पोपरे आल्या होत्या. या कार्यक्रमानंतर सौ. पोपरे यांनी फलटण तालुक्यातील कापडगांव येथे राजेंद्र व रामभाऊ केसकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
सौ. राहीबाई यांनी आपल्या जीवनकार्याबद्दलची माहिती सांगताना म्हणाल्या तुम्ही कितीही शिक्षण घेऊन मोठे व्हा, मात्र आपल्या मातीची नाळ कधीही तोडू नका. यावेळी कापडगांवचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ केसकर, सोसायटी सदस्य राजेंद्र केसकर, पत्रकार सुरेश भोईटे, राघू जाधव, बापूराव केसकर, मोरेश्वर खताळ, सचिन केसकर, हिंगणगांवचे सामाजिक कार्यकर्ते सुरज भोईटे यावेळी उपस्थित होते.