पुर्व वैमनस्यातून दोन गटात राडा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, पुणे, दि. 30 : पूर्वी झालेल्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना फरासखाना परिसरात घडली आहे. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.

तौफिक रियाज भोलावाला (वय १९, रा. कसबा पेठ) आणि रियाज भोलावाला अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अदिल भोलावाला आणि तोहीद भोलावाला अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रमेश उर्फ गोट्या कोळी (वय २९, रा. कसबा पेठ ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश उर्फ गोट्या व भोलावाला कुटूंब एकाच परिसरात राहायला आहेत. २०१५ मध्ये तौफिकने रमेश उर्फ गोट्या  वर कोयत्याने वार केेलेे होतेे. याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुुुन्ह् दाखल आहे. त्याचा राग मनात होता. या रागातून सोमवारी दुपारी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर भोलावाला कुटूंबियाला मारहाण करुन जखमी केेलेे.

तौफिक भोलावाला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रमेश उर्फ गोट्या कोळी, परवेझ सौदागार, पांग्या उर्फ समीर यांनी त्यांच्या भावाला मारहाण केली. त्याशिवाय तौफिक यांच्यासह वडिलांना वीट फेेेकुुन मारत जखमी केले. अधिक तपास सहायक निरीक्षक अभिजीत पाटील करीत आहेत. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!