सातारा जिल्ह्यात रब्बी पेरणी अंतिम टप्प्यात; कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, काशीळ, दि.१९: जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. जिल्ह्यात 87.93 टक्के क्षेत्रावर पेरणी कामे उरकली आहेत. पिकांत सर्वाधिक रब्बी ज्वारीची पेरणी झाली आहे. कांद्याचे दर समाधानकारक असल्याने कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणीची कामे अंतिम टप्प्यात असून, हरभरा आणि गहू पिकांची कामेही उरकत आली आहेत. रब्बी हंगामातील पिकांचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र दोन लाख 19 हजार 119 हेक्‍टर असून, त्यापैकी (ऊस वगळून) एक लाख 92 हजार 675 हेक्‍टर क्षेत्रावर म्हणजेच 87.93 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पिकांत सर्वाधिक रब्बी ज्वारीची लागवड झाली आहे. रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख 32 हजार 200 हेक्‍टर असून, त्यापैकी एक लाख 26 हजार 805 हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र 30 हजार 498 हेक्‍टर असून, त्यापैकी 25 हजार 202 हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मक्‍याचे सर्वसाधारण क्षेत्र 12 हजार 177 हेक्‍टर असून, त्यापैकी दहा हजार 236 हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. गव्हाचे 34 हजार 973 हेक्‍टर सर्वसाधारण क्षेत्र असून, त्यापैकी 29 हजार 443 हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. दुष्काळी तालुक्‍यात दमदार पाऊस झाल्याने पाण्याची उपलब्धता वाढली आहे. त्यामुळे पश्‍चिम भागासह दुष्काळी तालुक्‍यातही ऊस लागवड सुरू आहे. कांद्याचे दर सध्या समाधानकारक असल्याने जिल्ह्यात कांद्याचे क्षेत्र वाढणार आहे. कांदा बियाणे व कांद्याच्या तरावाचे दर वाढले असले, तरी शेतकऱ्यांकडून कांदा लागवड केली जात आहे. 

तालुकानिहाय रब्बी पेरणी (हेक्‍टरमध्ये) 

सातारा- 17,293, जावळी- 7,334, पाटण- 10,710, कऱ्हाड- 13,025, कोरेगाव- 21,197, खटाव- 27,000, माण- 3,95,050, फलटण- 25,272, खंडाळा- 16,557, वाई- 14,349, महाबळेश्वर- 433. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!