
स्थैर्य, वावरहिरे, दि. २०: राज्यासह माण तालुक्यामध्ये पावसाने यंदा जोरदार हजेरी लावलेली आहे. पाऊस हा खरीप पिकांना मारक जरी ठरला असला तरी रब्बी पिकांना हा पोषकच ठरलेला आहे. वावरहिरे, बिजवडी, दानवलेवाडी, डंगिरेवाडी, राणंद, थदाळे परिसरातील रब्बी हंगामातील ज्वारीची पिके जोमात बहरली आहेत. खरिप हंगामात हाताशी आलेली बाजरी, मका, भुईमूगासह ऊस३चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परतीच्या पावसाने शेतीची मोठी हानी झाली. काढणीवर आलेली पिके शेतातच कुजल्याने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शासनाने पंचनामे करून कागदी घोडे नाचवण्याचे खाम जरी केले असले तरी प्रत्यक्षात अधुन एकाही शेतकर्याला नुकसानभरपाई प्रत्येकक्षात प्राप्त झालेली नाही.